Marathi

Bail Pola Wishes in Marathi for Whatsapp Status, Messages, Photos

समस्त शेतकरी जनतेला 2021 मद्दे बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल, या खास दिवशी बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. अशा या पवित्र सणाच्या महाराष्ट्रातील तमामा शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

आज बैल पोळा आहे दिवस शेतकऱ्याच्या जोडीदाराचा. बैलपोळा सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. तर आज आपण बैल पोळा Whatsapp Sattus मराठी मध्ये येथे पाहणार आहोत आणि तसेच बैल पोळा स्टेटस तुम्हाला आवडत असतील तर बैल पोळा च्या शुभेच्छा, संदेश मराठी मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ते तुम्ही facebook आणि Whatsapp status वर, प्रतिमा, Message द्वारे मराठीत पाठवू शकता व साजरा करू शकता.

Top 10 Bail Pola Chya Hardik Shubhechha Status for Whatsapp

जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
bail pola status

जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
bail pola status

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
bail pola status

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
bail pola quote png

आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!


सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
bail pola status

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
bail pola status

कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!


आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!
bail pola status

आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!


झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
bail pola status

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!


झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
bail pola status

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
बैल पोळाच्या शुभेच्छा!


डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा!
bail pola status

डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
बैल पोळाच्या शुभेच्छा!


Bail Pola Shubhechha Messages in Marathi for Friends & Family

भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
म्हणजे आमचा लाडका बैल,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

आला रे आला बैल पोळा आला,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊन जाऊया,
सगळे राऊळा,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सणांच्या
सगळयांना हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा!

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

कष्टाशिवाय मातीला
आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
बैलांचा पोळा हा सण आला,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा !

आज पुंज रे बैलाले फेडा उपकारांचे देेणे,
बैला, खरा तुझा सण शेतकऱ्यांचा,
बैल पोळ्याचा शुभेच्छा!

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून,
काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती,
सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..

Bail Pola Nibandh in Marathi- Bail Pola Eassay for Students

आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार

खूप सुंदर शब्दात बहिणाबाई चौधरी यांनी बैलपोळा सणाचे वर्णन केले आहे.
श्रावण महिना म्हणजे सणांची भली मोठी रांगच. श्रावण महिन्यामध्ये आपण नारळी पौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे अनेक सण मोठ्या आनंदात साजरे करतो.
श्रावण महिन्यातील सणांबरोबर सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
बैलपोळा हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करणाऱ्या सर्जा-राजाचा सण.
विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बैलपोळा हा सण आनंदात साजरा केला जातो.
शेतकऱ्यासोबत मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.
बैलपोळा या सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असेही म्हणतात.

बैलपोळा या सणादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. या दिवशी सर्जा राजाला भल्या पहाटे ओढ्यात नेऊन अंघोळ घातली जाते. बैलांना जेवढे छान सजवता येईल तेवढे सजवण्यात येते.
बैलांच्या डोक्याला बाशिंग बांधले जाते. पाठीवर सुंदर नक्षीकाम असलेली झूल टाकली जाते. अंगावर रंगबेरंगी ठिपके काढले जातात. या दिवशी बैलांना नांगराला जुंपले जात नाही.
बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकले जाते. यालाच खांद शेकने म्हणतात.
बैल पोळा सणाला सर्वांच्या घराला आंब्याच्या पानाचे तोरण आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या वेळी शेतकरी आपल्या बैलजोडयाना ढोल, ताशा, सनईच्या आवाजात गावातील मंदिराजवळ घेऊन येतात. त्या ठिकाणी बैलांचे पूजन केले जाते.
या वेळी झाडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हंटली जातात.

बैल पोळा या सणाला प्रत्येक घरांमध्ये पुरणपोळ्या बनवल्या जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
या दिवस सर्जा राजाचे रूप खूप रुबाबदार व छान दिसते.
खूप लोकांजवळ शेती नसल्यामुळे त्यांच्या घरी बैल नसतात. असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि हा सण खूप आनंदात साजरा करतात.
आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. शेती करून खूप कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतात.
सर्जा राजा हा शेतकऱ्यासोबत शेतात राबत असतो. बैलांची शेतकऱ्याला खूप मदत होते.
पूर्वीपासून बैल शेतकऱ्याला खूप मदत करत आलेले आहेत. शेतीमध्ये तर खूपच मोलाचा वाटा बैलांचा असतो. काही वर्षे आधी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाड्यांच्या उपयोग केला जात होता.
आता आपल्याकडे गाड्या आल्यामुळे बैलगाड्यांच्या उपयोग खूप कमी झाला आहे.
अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने शेती केली जात असली तरीही शेतीमध्ये सर्जा राजाचे महत्त्व कमी होत नाही.
आजही खूप कुटुंबाचा उदरनिर्वाह सर्जराजामुळे होत आहे.
आपल्या आजूबाजूला असलेले मुके प्राणी हे आपल्याला नेहमी मदत करत असतात. या सर्व प्राण्यांची आपण काळजी घेऊया आणि त्यांना नेहमी आनंदत ठेवूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button