Marathi

Bharat ratna puraskar list in marathi

देशातील आतापर्यंतचे 48 ‘भारतरत्न’, भारतरत्न’चे सन्मानार्थी यांची यादी.

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे.

देशातील आता पर्यंतचे 48 ‘भारतरत्न’

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण – भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या – पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु – भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे – समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय – पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन – भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे – शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी – भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा – ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) – चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला – वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) – भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा – उद्योजक

29. सत्यजित रे – बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा – भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी – कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् – भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर – प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन – प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) – आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर – पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान – शहनाईवादक

41. भीमसेन जोशी – हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव – शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर – क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) – स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी – माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी – माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख – सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका – प्रसिद्ध गायक

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button