दिवाळी कविता मराठी | diwali marathi kavita
मानवतेचा आकाशदीवा लावुनी
रेखाटूया धर्मनिरपेक्षतेची रांगोळी
सुसंस्कारांच्या पेटवूणी पणत्या
प्रत्येका हृदयी साजरी करु दिवाळी
– अनिकेत देशमुख
आली दिवाळी
आली दिवाळी
सजून धजून
लक्ष दिव्यांची
आरास लेऊन
तमाच्या गळी
ज्योती माळून
पहाट तेजोमयी
मनात उजळून
झाली आितषबाजी
आनंदाची नयनातून
सरी दुःखाच्या
गेल्या गोठून
पसरली प्रभा अंगणी
आकाशिदव्यातून
करती स्वागत
रांगोळ्या दारातून
अज्ञानावर ज्ञानाचे
अत्तर शिंपून
हसली लक्ष्मी
शारदेच्या मुखमंडलातून
-डॉ. प्रीती ढगे
काढू सुंदर रांगोळी
काढू सुंदर रांगोळी
उटण्याची रे अंघोळी
फटाक्यांच्या आवाजात
आली आली रे दिवाळी….
आला सण दिवाळीचा
करू रोषणाई दारी
गोड मिष्ठान्नांनी डब्बे
भरतील घरोघरी….
सण येता दिवाळीचा
येते सय माहेराची
ओढ लागली जिवाला
माहेरच्या सुवासाची…
आले दौडत मी भावा
धावे गाडी भरधाव
ओढ मनाला भेटीची
कधी येईल रे गाव…
सण दिवाळीचा खास
यावे सर्वांनी एकत्र
मात ही अंधारावर
पडे प्रकाश सर्वत्र…
दीपोत्सव आनंदाचा
मांगल्याचा उत्साहाचा
उजळून रे निघावा
कप्पा हर्षाने मनाचा…
-गिता केदार
दिवाळीचे वेध
दसरा, कोजागिरीनंतर
लागतात दिवाळीचे वेध
सणांच्या ह्या राजाकडे
जातीधर्मात नसतो भेद
इवल्या-इवल्या दिव्यांची
काय वर्णावी बात
परमार्थाने स्वत: जळतात
पण तिमिरावर करती मात
अंधश्रद्धा नि भ्रष्टाचार
समाजातील अंध:कार
समुपदेशनरुपी दिव्यांनी
राष्ट्रविकासाला लावू हातभार
ध्वनिप्रदूषण नि वायुप्रदूषण
नक्कीच सारे मिळुनी टाळू
गाय, पती, भाऊ नि तुळस
निरपेक्षपणाच्या निरांजनाने ओवाळ
-शैलेष उकरंड