शुभ रात्री विचार – टॉप मराठी गुड नाईट संदेश
Good night wishes in Marathi

झोप लागावी म्हणून गुडनाईट चांगले स्वप्न पडावेम्हणून स्वीट ड्रीम्स आणिस्वप्न पाहतांना बेड वरून पडूनये म्हणून काळजी घ्या!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद!

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं काळजी घ्या दातं-बीतं पडतील

आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर आसु द्या

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना तिच माणसं आपली असतात सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो पैसा तर व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी

लाईफ छोटीशी आहे जास्त लोड नाही घ्यायच मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच

आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून जाऊ नका

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जरी तुमच्या सोबत होत नसला तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही आणि म्हणून मी तुम्हाला Message केल्याशिवाय राहत नाही

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!