100+ Marathi Charolya for Status and Captions
Table of contents
ऊन-सावली वाटेवरती
अस्मिता इनामदार.
दु:ख संगती आले
श्रणीक सुखाच्या शोधासाठी
मी मृगजळ पेरीत गेले
ज्याला नसतो
राजेश बरबडेकर.
स्वतःचा आत्मिवश्वास
तो करूच शकत नाही
दुसर्यांवर विश्वास
बळीराजा कर आता
राजेश बरबडेकर.
दुष्काळाचीच हत्या
करू नका तु
स्वतः आत्महत्या
लाजुन हा चंद्र
प्रकाश सुर्यवंशी.
माझ्या मिठीत आला
ना त्याला कळले ना मला
निशिगंध हा का फुलला
पाहुन एक चहेरा अचानक
प्रकाश सुर्यवंशी.
आठवण तुझी जागवुन गेला
हळुवार डोळयाच्या कडा
अचानक ओलावुन गेला
मठीत येता अविचत सखया
तनुवर फुलली स्पशर्फुले
शब्दावाचून कळले सारे
भाव मनीचे अलगद टिपलेअस्मिता इनामदार.
Best of charoli in Marathi
चारोळी करणं सोप अन छान असत.
एका ओळीत वाळवंट तर
दुसऱ्या ओळीत
हिरवं रान असत..
चारोळ्या माझ्या नाहीत
कविताही माझ्या नाहीत
तरीही या काव्याची मैफ़िल
सजते माझ्या वहीत.
चारोळी असते ती अशी
चार शब्दात खुप काही सांगणारी
कळन्यार्याला चार शब्द पुरेसे
न कळनार्याला काव्य अपुरे..
गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,
गालावरची खळी पड़ते
डोळ्यात तुझे स्वप्न रंगवतो
का बरं असा मी
स्वताला तुझ्यात गुंतवतो
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,
marathi charolya on life
आयुष्य फक्त
जिंकण्यासाठी नसतं
कधी हरण्यासाठी
तर कधी शिकण्यासाठी असतं.
प्रत्येकाने आयुष्यात
खूप व्यस्त असावं,
जे पैश्याने नाही मिळणार
ते कमवून बघावं.
हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही .
हरणे तर नसते कुणातही
असतो तो खेळ नियतिचा,
कधी सुखातं हसू तर कधी
दु:खातं मनाला रडवण्याचा.
हताश नाही व्हायचं
प्रेमात धोका मिळाला तर,
जगायचं त्यांच्यासाठी ज्यांनी
जीव लावलायं आपल्यावर…
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला
स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहीत…
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहीत….
पाहिजे असलेलं मिळवण्यासाठी
कुणाला काबाडकष्ट करावे लागते,
तर कुणाला ते जन्मजातच मिळते
मित्रहो जिंदगी ही अशीच असते.
कुणाला पैशाची कमतरता,
कुणाला आरोग्याची, अन नात्यांची चिंता
सर्वगुणसंपन्न इथं कुणीच नसते,
मित्रहो जिंदगी ही अशीच असते.
कुणी सत्तर वर्ष जगते
तर कुणी तिशीतच जाते
जो दुसऱ्यासाठी जगते
शेवटी तोच लक्षात राहते.
इतरांशी तुलना करून
इथं बरेच होतात दुःखी
जे स्वतःशी तुलना करतात
तेच असतात सुखी.
सुखात सोबत असणारे
सर्वच खरे नसतात
जे दुःखात साथ देतात
तेच फक्त हिरे असतात.
दुःख काय असतं
हे कळतं सगळ्यांना
मात्र दुःखात सुख शोधण
नसेल जमत सगळ्यांना.
यश कुणासाठी, अपयश कुणासाठी
जीवनभर फक्त राग का इतरांसाठी
जो आला जन्माला, तो जाईल एकदिवस
मग एवढा मनात अहंकार कशासाठी.
आपले डोळे बंद झाल्यावर
इतरांच्या डोळ्यात अश्रू यायला हवे
ज्यांनी जीवनभर त्रास दिलाय
त्यांनीही गुणगान गायला हवे.
दुःखाने कितीही घेरलं तरीही
चेहऱ्यावर आनंद असावा
जे मिळणार नाही प्रयत्नानंतरही
त्याचाही मनापासून स्वीकार करावा.
गरिबाला जेव्हा
हसताना पाहिलं,
पैशाचं महत्व माझ्यासाठी
तेव्हा कमी झालं.
एक झलक पुरेशी असते मला
तुझ्या आठवणीत दिवस काढ़ायला….
तीच तर देते पून्हा उर्जा
त्याच वाटेवर तुझी आस लावून बसायला….
एक दिवस तरी सुख ,
धावून माझ्याकडे येईल …
दुःखाशी लढण्यास ,
माझ्या बाजूने होईल ..
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे
एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..
एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पाया खालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!
एवढ्या तेवढ्यानं होत असत
तर मी तेवढच केल असत
पण माहीत आहे मला ते तेवढ
जन्मभर पुरल नसत..
ओघळणारे अश्रू कधी
जिकंत वा हरत नाहीत,
भावनाच रडतात सार्या
आठवणी कशा सरत नाहीत?
ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे
कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हि त्याच्यावरच विश्वास ठेवतो
हस-या या चेह-यामागे,
खूपसं दुःख दडलेले…
काहींना ते हसणेही,
कधी ना पहावलेले…
charoli in marathi on love / Wife
ओले त्या धुंद क्षणांची
सर आठवणींची ओली
ओंजळीत मी धरलेला
पाऊस तुझा मखमली…
हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे.
सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना…
ओढणी धरावीस डोक्यावर
पावसाचा थेंब पडताना….
हळूच दबक्या पावलांनी ,
तुझ्याकडे मी यायचं…
आणि तूला ते दरवेळी ,
आधीच कसं गं कळायचं ?
ओठ माझे तुझ्या ओठांवर ,
येऊन विसावतात…
ते क्षण एकांतात आठवले ,
तरी लाजवतात…
ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…
हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी
चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे
ठेवून गेलंय….
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी
आपल्याच विश्वात रमणारं!
खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…
खरी जरी असेल प्रित तुझी…
का केली नाही तु व्यक्त…
सदा वाट बघण्यात तुझी…
आटले माझ्या देहाचे रक्त..
marathi charolya prem
सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले
एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करून बसेल…
ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…
स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नवासा….
स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…
साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु….
सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली…
सोबत नसतेस तरी ,
तुझा स्पर्श जाणवतो…
का? आजही हा जीव,
तुझ्यासाठी तळमळतो…
होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला
होकारांला शब्दांना महत्व नसते
दाटल्या भावानांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते..
हे प्रेमाचं असचं असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..
ही कवितांची वही उघडा
पण जराशी जपून
नाहीतर चाहूल तुमची लागताच
शब्द बसतील लपून..
हृदयात नेहमीच तुझ्यासाठी
थोडी जागा जपून ठेवतो…
कधीतरी येशील म्हणून त्या
जागेवर फुले पांघरूण ठेवतो…
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल…
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…
हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्यातरी मनाची रानी…
ही भेटच नाही तर फक्त
एक माझी आठवण आहे
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे
हसत असतो, पण मनात कुठेतरी
दुःख नेहमीच असतं…
हसता हसता, अचानक
डोळ्यात पाणी दाटतं…
हाताच्या ओंजळीतं खूप सारी
स्वप्ने रेखाटलेली आहेतं,
ती तुझ्या आणि माझ्यासाठी
नव्याने साकारलेली आहेत
हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..
हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले….
हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..
तसा जीव सुटतो देहातून….
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून…
हा पहाटेचा पाऊस अन
माझे डोळे मिटलेले
तुझे माझे क्षण ओवताना मनात
काही क्षण सुटलेले…
marathi charolya on friendship / मैत्री वर चारोळी
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते
वाइट वेळेवर मराठी चारोळी
वेळ जीवनात
सर्वकाही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते.
दररोज आपल्याला पाहणारे
बरेच लोकं असतात
पण लक्षात जास्त तेच राहतात
जे पाहून न पाहिल्यासारखे करतात.
मानवतेच्या या दुनियेत
माहीत नाही किती दिवस राहू
पण इथून जातांना मात्र
लोकांच्या मनात घर करून जाऊ.
हातात टच फोन असणं
हे आजच्या वेळी गरजेचं आहे
पण सगळ्यांच्या टच मध्ये राहणं
हे चांगल्या जीवनासाठी गरजेचं आहे.
एकदा अहंकार चढला की मग
माणसाला माणूस दिसत नाही
दिव्याला जसा मग
त्याखालचा अंधार दिसत नाही.
कुणी आपल्याला दुखावल्यावर
चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे,
वादळे बरीच येतील जीवनात
त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे.
कुणी सोबत असेल तर
खूप मस्त आहे जिंदगी
पण फक्त पैसाच असेल सोबती
तर मात्र त्रस्त आहे जिंदगी.
कशीही असली जिंदगी
तरी नेहमी आनंदी राहावं
एक संकट गेलं तर
नेहमी दुसऱ्यासाठी सज्ज असावं.
नाही सहन झालं दुःख
तर थोडं रडून घ्यावं
दुःख सावरताना मग
सुखासाठी पण तयार असावं.
जे असतील नाराज
त्यांना एकवेळ समजावून बघावं
तरीही नाही समजतील
तर त्यांच्यापासून कायम दूर राहावं.
चंद्रावर मराठी चारोळी
चांद भरली रात आहे,
प्रियकराची साथ आहे..
मोगऱ्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसत आहे…
काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो..
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…
चंद्र एकटा आकाशीचा
असूनही तारका सभोवती
एकाकी राहतो सदैव
एकांताशी जुळली प्रीती..
चांदण्याची सवय ,
खुपच असते भारी..
चांदरातीच्या मिलनाला..
उगाचच त्यांची लुडबुडती हजेरी….
चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही
marathi charoli for girl
किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जीवनाची
कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु सोंजळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……
क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्यास असतो तुझ्याच मनात
क्षण सरून गेलेले
आज आठवती पुन्हा
जुण्या आठवांची जखम
देई दर्द पुन्हा पुन्हा..
क्षणात होत उदास मन
कस काही बोलत नाही?,
स्वप्नात ते हरवून जातं
त्या आठवणिं संपत नाहीत
खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.
खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…
मराठी चारोळी आठवणीवर
का आठवणीत ही येते सये
तू नेहमी हसरा चेहरा घेवून,
नुसत्या आभासातून हि जातेस
माझ्या चेहऱ्यावर हास्य ठेवून…
सरलेल्या आयुष्यात ही
थोड्या आठवणी आहेत,
सुखाचे क्षण जरी विसरले
त्या आठवणी सोबतीला आहेत
का कसे कुणाचे तरी मन कुणावर तरी जडते?
मग फक्त तिचेच स्वप्न रोज भल्या पहाटे पडते.
आता मोहक तिचे रूप माझ्या रोजच्या आठवणीतले,
नि रोजचे हे शब्दाश्रू माझ्या मनांतल्या साठवनितले.
किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा…
कुणीतरी आपली आठवण काढतंय,
असं सारखं वाटतंय…
म्हणूनच की, काय आजकल उचकीचं
येणंही खूपच वाढलंय…
चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं…
ह्रदयातील माझी जागा तुझ्या
येण्याने भरुन गेली…
तू गेल्यावर ती जागा तुझ्या
आठवणींत बूडून राहीली…
ह्रदयात एक जखम
आजही सळत होती…
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती…
हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघत बसतो…
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
One Comment