Marathi

Sant Janabai yanche abhang

संत जनाबाई यांचे १० निवडक अभंग

ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ||१||
भीमा आणि चंद्रभागा | तुझे चरणींच्या गंगा ||२||
इतुक्यांसहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ||३||
माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

संत जनाबाई (अभंग)

नोवरियासंगे वाडियां सोहळा ॥

मांडे, पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनि संगें लोहे होय सोनें ॥

तयाची भूषणें श्रीमंतांसी ॥२॥
जनी म्हणे जोड झाली विठोबाची ॥

दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥

संत जनाबाई (अभंग)

आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणें रानीं ॥२॥
मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजविण काय करूं । प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे । धाव घालीं माझे आये ॥५॥
माझी भेटवा जननी । संतां विनवी दासी जनी ॥६॥

संत जनाबाई (अभंग)

ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें । बा तुझ्याचि पोटा यावें ||२||
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी । जन्मोजन्मी म्हणे जनी ॥४॥

संत जनाबाई (अभंग)

गंगा गेली सिंधूपाशी । त्याने अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरि तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरां । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आल्यें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥

संत जनाबाई (अभंग)

यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तीचा कळवळा ॥१॥
त्याचा झाला म्हणियारा । राहे घरीं करी थारा ||२||
देव बाटविला त्यानें । हांसे जनी गाय गाणें ||३||

संत जनाबाई (अभंग)

पाय जोडुनि विटेवरी । कर ठेवूनि कटीवरी ॥१॥
रूप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ||२||
गळां वैजयंती माळा । तो हा मदनाचा पुतळा ॥३॥ गरूड सन्मुख उभा । जनी म्हणे धन्य शोभा ॥४॥

संत जनाबाई (अभंग)

हरिहर ब्रह्मादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा | जाली बोलायाची सीमा ||२||
जपें तर्फे लाजविलीं । तीर्थं शरणागत आलीं ॥३॥
नामदेव कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ||४||
वेदश्रुति देती ग्वाही । जनी म्हणे सांगूं काई ||५||

संत जनाबाई (अभंग)

देव भावाचा लंपट । सोडुनि आलासे वैकुंठ ॥१॥
पुंडलीकापुढे उभा । समचरणाची शोभा ||२||
हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचे अवलोकी ॥३॥
उभा बैसेना सर्वथा । पाहे कोर्डे भक्तकथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥

संत जनाबाई (अभंग)

वैकुंठीचा हरी । तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
रांगतसे हा अंगणी । माथां जावळाची वेणी ॥२॥
पायीं पैंजण आणि वाळे । हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा माय । दासी जनी वंदी पाय ॥४॥

संत जनाबाई (अभंग)

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!