प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत शुभेच्छा ज्या तुम्ही मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. या शुभेच्छा, संदेश आणि कोट्स तुम्ही whatsapp, Facebook आणि instagram सारख्या सोशल मीडियावर शेअर करू शकता
Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
सचिन कुलकर्णी
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती

देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!