Teacher’s Day wishes in marathi – SMS, Status, Quotes
5 September 2021 – Teachers day!
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आजच्या लेखात आपण शिक्षकांविषयी काही कोट्स पाहणार आहोत, ज्या शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्व हे अनन्यसाधारण असते. तर चला पाहूया काही कोट्स ज्या शिक्षक दिनाला आणखीच चांगले बनवतील.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, सादर प्रणाम!
गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवी महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले या अविद्येचा काळोख ठेवून विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
आईच आपली पहिली गुरू
तिच्यापासुन होते
आपले अस्तितव सुरु
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या!
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मूल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा…!!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!