Marathi

Krishna Janmashtami Wishes Marathi गोकुळाष्टमी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा 2022

श्रीकृष्णांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मित्र आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छा…श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या लीला, नीती, धोरणे, मुसद्देगिरी, कथा यानिमित्ताने पुन्हा आळवल्या जातात. श्रीकृष्णांची शिकवण आचरणात आणण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्याचा संकल्प केला जातो. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मित्र आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छा…

हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi)2022

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव मोठा नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!

दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi) 2022

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर nउताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi)2022

गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

दह्यात साखर आणि,साखरेत भात,दही हंडी उभी करुया,
देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लाऊया उंच उंच थर,
जोशात करुया दही हंडीचा थाट…
जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.

एकच जल्लोष एकच लय
बोल बजरंग बली की जय
श्रीकृष्ण जन्माष्टमी
दहीहंडीच्या शुभेच्छा.

कृष्ण जन्माष्टमी कोट्स (Krishna Janmashtami Quotes In Marathi)2022

वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे) जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
अन्यायाचा कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता कोणीकडे.. (दासबोध)
अर्थ: सकाम भक्ती केली तर कामना पूर्ण होईल. जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण जन्माष्टमी मेसेज (Krishna Janmashtami Message In Marathi)2022

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दह्याची हंडी पाण्याची फवार, लोणी चोरायला आले कृष्णराज
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा मोठा निराळा आहे, सर्वात मोठ्या समस्येला कृष्णाने क्षणात पार करून टाकले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Amey Zilpelwar

Hi i am amey, i have done my post graduation in MBA marketing. blogging is different kind of addiction that i have.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!