Marathi

Marathi status on Life, Relations, Attitute & Love

रॉयल मराठी स्टेटस- नाती, Attitude, Life 👇

आता तुमच्या दैनंदिन जीवनात, आम्हाला नेहमी तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी चांगल्या Whatsapp statusआणि संदेशाची आवश्यकता असते. तर येथे आम्ही तुम्हाला जीवन, प्रेम, वृत्ती, नातेसंबंध आणि बरेच काही वर मराठी मध्ये टॉप 100 Whatsapp Status शेअर करत आहोत.

तुम्ही हे Marathi Status तुमचे मित्र, कुटुंब, नातेवाईकांसोबत शेअर करू शकता:

काही वेदना असह्य असतात
पण सहन करण्याशिवाय दुसरे मार्ग नसतात..!!

झीजलात तरी चालेल पण, गंजून जाऊ नका.

बोलणारे बोलून जातात.
सहन तर ऐकणाऱ्याला करावं लागते.

🍀रडवणाऱ्या लोकांपेक्षा हसवणारी लोक जास्त काळापर्यंत स्मरणात राहतात!🍀

✨अनुभवाचं पुस्तक एकदा का उघडल की माणूस कधी रडत ही नाही, आणि खचत ही नाही..!✨

इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःतल्या चुका शोधा म्हणजे त्यांच्या दोषातले घाव तुम्हांला वेदना देणार नाहीत…

नाती आणि पैसा यांमध्ये प्राधान्य कशाला द्यायचे माहित असूनही पैशामुळे नात्यांमध्ये दुरावा येतोच.

दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्यानेही बऱ्याचदा आपली उसवलेली ठिगळं सुध्दा बुजवता येतात…!!!✌️🤝💯✅

समजूतदारपणाचा उपयोग कमी आणि गैरफायदाच जास्त घेतला जातो….

समोरच्याला योग्यवेळी योग्य उत्तरही देता आले पाहिजे नाहीतर लोक आपल्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतात…

ज्यांची आयुष्याच्या बाबतीत फार काही स्वप्न नसतात ते नेहमीच दुर्लक्षित पण समाधानी असतात.

समजूदारपणा आणि शांतता हे वया वर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात…

जास्त स्पष्टीकरण देणाऱ्या लोकांवर जास्त लोकं संशय घेतात !

प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं, कधी कधी मौन राहणं खूप फायदेशीर ठरतं.

विजयात जमिनीवर ठेवणारे काहीच असतात मात्र पराभवाचा जयजयकार करणारे समूहात असतात.

चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवस पण छान जातात.

जितक्या लवकर स्वतःची पायरी ओळखाल तितके लवकर यशाची पायरी चढाल !!

दोस्ती एकमेकांवर जळणं नाहीतर , एक दुसऱ्याची साथ देणं आहे.

“बापाचा हात उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही….!”

वेळोवेळी अपमान सोसूनही सहज उपलब्ध होणाऱ्या व्यक्तीची किंमत समोरच्याच्या नजरेत शून्य असते.

माणसाला दोनच गोष्टी जास्त हुशार बनवतात
एक वाचलेली पुस्तक आणि
भेटलेली माणसं..!!

कपाळावर लिहिलेलं नशीब टाचेला भेगा पडल्याशिवाय खरं होत नाही.

सवय होणं हे खूप त्रासदायक असतं. मग ती व्यक्तीची असो किंवा कुठल्या गोष्टीची…

कोणासाठी तरी सतत उपलब्ध असणं म्हणजे..
स्वतःची किंमत कमी केल्या सारखचं आहे.

किंमतीवरुन अस्तित्व टिकत नसत,
तर अस्तित्वावरुन किंमत ठरत असते..!!

मैत्री हे नातं खूप सुंदर असतं. ..
त्यात कुठलं बंधन नाही ना कुठली अट. ..
फक्त मनमोकळं जगायचं असतं. ..

हरवलेल्या गोष्टी सापडतात ….
दुरावल्याला विसराव्या लागतात ….

✨वदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही 💯

मन त्यांचचं जपा .. ज्यांनी कधी ते जपण्याचा प्रयत्न जरी केला असेल…❤️

नांव कमवायला कष्ट घ्यावे लागतात …. बदनामी तर फुकटात मिळून जाते. !

शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो…😇

दुसऱ्याने सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर माणूस डोळे झाकून विश्वास ठेवतो…
पण खरं काय आणि खोटं काय हे कधीच बघत नाही.

प्रेम तर सगळ्यांचं सारखं असत… प्रत्येक व्यक्ती बद्दलच्या भावना वेगळ्या असतात…

अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं !!!

मौनात दडलेले अर्थ आणि शांततेत लपलेला आवाज ज्यांना समजतो तेच खरे आपले शुभचिंतक…!

डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही खरे असतात आणि तुम्हाला समजणारा कोणी नसतो…

एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही दुसरे स्वप्न बघण्याचा धाडसाला आयुष्य म्हणतात..!

चांगली पुस्तके वाचणारा माणूस मालक जरी बनला नाही तरी, गुलाम मात्र तो कधीच बनत नाही.

जग तुम्हाला “विकायला” बसलयं तुम्ही फक्त टिकायला शिका..🤘

माणसाचा स्वतः वरचा विश्वास संपला कि आपोआप त्याचं अस्तित्व ही संपून जात.

मैत्री हे अस नात आहे जे रक्ताच नसल तरी खात्रीच असत.💯

जिभेचं वजन कमी असलं, तरी तिचा तोल सांभाळणं कठीण असते.

पैशामागे धावून करियर बनत नाही, पण करियरमागे धावून पैसा नक्की बनतो.

वाईट वेळ निघून जाते, पण जाताना आपल्या परक्यांची ओळख करून देते.

काही लोकांना मुद्दाम “घाव” द्यायची आणि त्यावर पुन्हा मलमपट्टी करायची किंवा मिठ चोळायची खुप विचित्र सवय असते..!!

वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा…
कारण आजचा न्युज पेपर उद्या रद्दी मध्ये पडलेला असतो.

“आयुष्यात खूप काही हरवून बरीचशी जागा मोकळी झाली की संयम आणि धैर्य आपोआप मुक्कामाला येतात”

ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो ते दुसऱ्यांवर पण कधीच विश्वास ठेऊ शकत नाही.

आज आराम करून आयुष्यभर
कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात
कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं.

समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा गरजा कधीच पूर्ण होत नसतात.

प्रभाव दमदार असण्यापेक्षा, स्वभाव दिलदार असण कधीही चांगल असत….!!

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर…नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.

मैत्रीचं नातं खूप सुंदर असतं… जगाने संशय घेतला तरी मनात कायम स्पेशल असत.

“समज“ कमी असेल तर..
“गैरसमज“ व्हायला वेळ लागत नाही!

तुम्ही वेळेला किंमत द्या मग वेळ आपोआपच तुमच्या प्रयत्नांना किंमत देईल.

मैत्री रागवणारी हवी, बदलणारी नाही !!

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे,
हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.

आपली पाठ नेहमी शाबूत ठेवा कारण
शाबासकी आणि धोका मागूनच भेटतो .

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी …
“अनुभव “ म्हणजे काय हे तेव्हाच कळते …!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते

“कष्ट अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.”

क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर टिकवण्यासाठी मनात आभाळभर प्रेम असावं लागतं.

कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही,
आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही …

वेळ वाईट असली की तुमच्या चांगल्या गोष्टी पण वाईट नजरेतून पाहिल्या जातात.

भूतकाळाच ओझ पेलता येत नसेल तर किमान तसा भूतकाळ पुन्हा तयार होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं… 😊

अनुभव हा
आपल्या जीवनातील
स्वयंशिक्षक असतो.

जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळ मिळत नाही.

प्रेम करणे म्हणजे अहंकार गळून पडणे, हरवणे. प्रेम करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तिला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची मुभा देणे, शरण जाणे.

आयुष्य कितीही सुंदर असले तरी आपल्या माणसांशिवाय अपूर्ण असतं.

काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हळुवारपणे जतन करून ठेवाविशी वाटतात.

आयुष्यात खूप आठवणी असतात मात्र आठवणींना कधी आयुष्य नसते…

अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सुर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो…

कुठूनही घसराव माणसाने फक्त नजरेतून घसरू नये… कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतो मनावर नाही.

गरज असते ती मानसिकता बदलण्याची. मात्र, बदलली जाते भूमिका.

भविष्यासाठी भुतकाळापेक्षा वर्तमानकाळ जास्त महत्वाचा असतो.

एक चांगलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते…

आपण कमी बोलतो कि जास्त हे महत्त्वाचं नसतं. तर आपण कधी, काय आणि कोणासमोर बोलतो हे महत्त्वाचं असतं.

तोंडात गोड आणि मनात खोट असणारी माणसं कधी घात करतील हे सांगू शकत नाही°°°📘

प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याला त्याला माहित असतात.

आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण असल्याने कोणी नाराज नाही झाल पाहिजे …!!

भावना प्रमाणापेक्षा जास्त गुंतल्या की
त्या नात्यात आपोआप आपण गुंतत जातो…!!

पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात.

“संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं.”

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे; तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात…!!!✌️🤝💯

माणसाकडे तुंडूंब भरलेले धन नसले तरी चालेल पण काठोकाठ भरलेले मन नक्कीच असले पाहिजे.

अपेक्षा त्याच लोकांकडून ठेवा जे तुमचं मन जाणतात आणि जपतात. ✍🏻

शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलंय…

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना… त्या दिवसापासून “रुसायचा” आणि “थकायचा” अधिकार संपतो.

शुन्याला किंमत तीच व्यक्ती देते,
जी कष्ट करुन शुन्यातून आयुष्य घडविते…

✍🏻 यशस्वी होण्याच तंत्र ,
मेहनत नावाच्या मंत्रात आहे.

‘चांगल्या’ लोकांकडून एक वेळ ‘अपमान’ झाला तरी चालेल पण ‘वाईट’ लोकांकडून कधिच ‘सन्मान’ होता कामा नये.

मृत्यूला घाबरू नका,
तो तर तुमच्या जीवनाचा एक भाग आहे.
जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी,
लावलेला वेळ म्हणजेच जीवन आहे.

आपलं दुःख लोकांसमोर सांगत बसू नका लोक त्याचा नेहमी बाजार भरवत असतात. 😊

ज्याच्या जवळ स्वत:ची बुध्दी वापरण्याचं आणि
ठाम, निर्णय घेण्याचं कौशल्यं असतं, तो कधीच
दुसऱ्याच्या हातचे बाहुले बनत नाही…

आपल्याच धुंदीत राहिलेलं बर…दुसऱ्यांचा विचार करत बसलात तर हसणं विसरून जाल…

मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागते.

आयुष्याचा सर्वात सुंदर आणि सुखी काळ तोवरच असतो जोवर आपल्यावर कुठली जबाबदारी नसते…

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत…
वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो…

जितके चांगले वागाल,
तितके वापरले जाल…🖤🍁

श्रीमंतांकडे पाहून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबतीत कसल्याचं तक्रारी उरतं नाहीत…

आयुष्यात जो जास्त नाती जोडतो त्यापेक्षा जोडलेली नाती शेवटपर्यंत जिवंत ठेवतो तोच श्रेष्ठ असतो.

माणसाचे कर्म स्वच्छ असलं की जगात तो मान नेहमी ताठ करून जगू शकतो…! 🍂

🎭’हसणं आणि हसवणं;
परमेश्वराची माणसाला ही केवढी देणगी.
फक्त माणसाला ह्या देणगीची जाणीव हवी.’🎭

कधी कधी आपले जगणे नाही तर जगण्याचा अर्थ मोठा असायला हवा.

माणूस एकदा विचारांच्या दलदलीत रुतत गेला की तो त्यात रूपातच जातो वेळीच त्याला कोणी तरी हात देऊन बाहेर काढणार हवं असत. 💕

माणसाने नेहमी स्वतःशीच प्रामाणिक असावे बाकी चांगुलपणाचे मुखवटे उघड करायला आपलं कर्म आहेच की….!!!

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..

परिस्थिती कितीही आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळत असतं…!!!🤝💯

पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहीलेलं असेल ह्या आशेवर मागचं पान झाकत जाणे म्हणजेच आयुष्य ….

आयुष्यात सुखाची झोप तोपर्यंतच लागते,
जो पर्यंत आई-बाप जवळ असतात….

जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला…
“आत्मविश्वास” आहे!

संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं; पण संकटाचा सामना करणं माणसाच्या हातात असतं…

लोक स्वतःच्या कुवतीप्रमाणे दुसऱ्यांचा स्वभाव, चारित्र्य आणि योग्यता ठरवत असतात…!!

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वाना मिळतो ,
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही…

आजूबाजूच्या फक्त प्रश्न विचारण्याऱ्यांच्या गर्दीत उत्तरं शोधायला मदत करणारे भेटणं म्हणजे सुख!

व्यक्त होण्याला मर्यादा येतात तेव्हा समजावं माणूस म्हणून योग्य व्यक्ती निवडायला कमी पडलोय.

आपल्या शब्दाला महत्त्व देत नसलेल्या व्यक्तीसाठी मौन हे सर्वोत्तम उत्तर आहे..

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!