Happy diwali wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | 2022
दिवाळीसाठी आपल्याला ग्रीटिंग किव्हा मराठीत wishes messages हवीय, तर आपल्यासमोर आहेत काही उत्तम निवडलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा!, जे आपण आपल्यानसोबत message किव्हा whatsapp ने picture प्रमाणे share करून दिवाळीचा आनंद वाढवू शकता.
खाली दिवाळी विषयक शुभेच्छा संदेश आणि ग्रीटिंग दिले आहेत, आपल्याजवळ जर इतर असतील तर आम्हाला पाठवा. धन्यवाद.

Dipawali wishes in Marathi
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,
सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही
आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली.
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास,
फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.
शुभ दीपावली!
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dipawali quotes and messages in Marathi

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची,
दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी
आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.
हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
Diwali Marathi greetings for whatsapp and facebook

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून
आपणास आणि आपल्या परिवारास
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Funny Diwali message in Marathi

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका!
Happy Diwali
तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की,
चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.
त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.
तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.
आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.
देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.
जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.
जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर एक रॉकेट विकत घ्या, त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.
इकोप्रेमी दिवाळी साजरी करा, ध्वनी रहित दिवाळी साजरी करा म्हणजे आपल्या बायकोला तिच्या घरी पाठवून द्या Happy Diwali!
या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई
मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.
मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल. हॅपी दिवाळी!
Diwali Marathi status for WhatsApp and Facebook

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली!
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !