Marathi

Top 5 Mazi shala nibandh in Marathi

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi

Mazi shala nibandh marathi picture, 
माझी शाळा निबंध फोटो
my school marathi essay

1. Mazi shala nibandh for little children [easy]

माझी चार मजल्यांची शाळा असून खूप सुंदर अशी इमारत  आहे. ही एक मंदिरासारखे आहे जिथे आपण दररोज शिक्षणासाठी जातो. शाळेत सर्वप्रथम आम्ही प्रार्थना करून वर्ग शिक्षकांना नमस्कार करतो, नंतर आम्ही अभ्यासक्रमानुसार वाचन सुरू करतो. मला दररोज शाळेत जायला आवडते. माझ्या शाळेत, शिस्तीला खूप महत्व आहे जी नियमितपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाळली आहे. मला माझ्या शाळेचा पेहराव खूप आवडतो. माझी शाळा माझ्या प्रिय घरापासून दोन किलोमीटर दूर आहे आणि मी शाळेत पिवळ्या रंगाच्या बस मध्ये जातो. शाळा अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे, जे प्रदूषण, आवाज, घाण पासून दूर आहे.(माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी)


2. Mazi shala nibandh for 5th class

माझी शाळा सुरु होते पावसाळ्यात, त्यामुळे मुलांना आयते पावसात भिजायला आणि मजा करायला मिळते शिवाय नवीन छत्री किंवा रेनकोट मिळतोच. शाळेत जाताना सगळ्या वस्तू नवीन मिळतात. दप्तर, पाण्याची बॉटल, खाऊचा डबा, नवी वही, पुस्तक, शालेय वस्तू इ. आणि बराच काही. काहींना तर शाळा, शाळेतील बाई, मित्रमैत्रीनीही नवीनच असतात त्यामुळे शाळेत जाण्याचा उत्साह वेगळाच असतो.
शाळेचा पहिला दिवस काही मजेदार असतो. एकतर पाऊस पडत असतो त्यात मजा घेत घेत शाळेत जायच. सोबत जर तीन चार मित्रमैत्रिणी असतील तर मग मौज विचारायलाच नको नाही का! मस्त दंगा मस्ती करत शाळेत जातात. शाळेत पोहोचल्यावर सगळे आनंदी चेहरे दिसायचे.. त्या आनंदाच्या भरात नवीन दप्तर, वह्या, कंपास पेट्या, वगैरे एकमेकांना दाखवताना मजा यायची. अनेक दिवसांनी सगळे भेटायचे त्यामुळे बर वाटायचं. सुट्टीमधल्या गप्पा गोष्टी एकमेकांना सांगायचे त्यामुळे वर्ग चालू असला तरी गप्पांचा आवाज काही थांबायचं नाही. सुरुवातीच्या काही दिवसात अभ्यासही कमीच असतो त्यामुळे काही दिवस धमाल करण्यात जायचे.

माझी शाळा सकाळी भरते त्यावेळी प्रार्थना, प्रतिज्ञा, वगैरे घेतल्या जातात. जनगणमन घेतले जाते जेणेकरून मुलांवर सुरुवातीपासूनच देशप्रेमाचे संस्कार केले जातात. प्रार्थनेतून सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली जाते जी पुढच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. शाळेच्या पहिल्या काही वर्षातच मुलांच्या पुढील आयुष्याचा पाया रचला जातो. बंधुभाव, खरेपणा, समता ही मूल्ये मुलाच्या मनावर बिंबवण्याचा अवघड कार्य शाळा पार पडत असते. शिक्षक हे खूप परिश्रम घेऊन मुलांना शिकवत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात. शाळा विविध स्पर्धा आयोजित करते व मुलांच्या कलागुणांना वाव देते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही” हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य शिक्षणाची महती सांगते आणि असे शिक्षण मिळणे शाळेविना शक्य नाही. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप वाटा असतो, एक म्हणजे आई, दुसरे आपला परिसर, तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना जास्तीत जास्त वेळ आपण शाळेत घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकत असतात आणि सगळ्या शाळा ती जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पेलतात. म्ह्णून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्वाचे कार्य करते. माझी शाळा माझी जबाबदारी.


3. Mazi shala nibandh for 7th class

आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो. आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जातो. आईबाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे.
ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळाही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनचमला माझी शाळा खूप आवडते. (माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी)


4. Mazi shala nibandh [Short essay]

आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. तिथे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा,संविधान, सरस्वती वंदना नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हटला जातो. त्यानंतर बाई दिनविशेष सांगतात. मग सुविचार सांगून प्रत्येकाला वर्गात सोडले जाते. शिकवणीचे तास झाले कि मधली सुट्टी होते.आम्ही सर्व मुले शाळे बाहेरच्या अंगणात गोल करून जेवण करतो. एकमेकांचे पदार्थ खातो.त्यांनतर पुन्हा शाळा भरायची घंटा होते. अशा आमच्या शाळेत तीन मधल्या सुट्ट्या होतात. दोन छोट्या आणि एक मोठी. असे करत करत शाळा सुटायची घंटा वाजते कधी याची वाट पाहत बसतो आम्ही मुले.(माझी शाळा निबंध मराठी इयत्ता तिसरी)


5. Mazi shala nibandh for up to class 10th

आमच्या शाळेत एकूण एक हुशार शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे. आणि शिकवण्यात तर त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही. ते फक्त धडे वाचून दाखवत नाहीत तर त्या अनुषंगाने जगभरची माहिती आम्हाला देतात. वेगवेगळी उदाहरणे देतात. सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यांचा भर हा विद्यार्थ्यांना पुस्तकी किडे ना करता सर्व माहिती असलेले करण्यावर असतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात. कोणीही शिक्षक नुसता भूगोल किंवा नुसते गणित असे एक्स्पर्ट नाही तर ते कोणताही विषय तितक्याच कुशलतेने शिकवतात. त्यामुळे सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे आम्हाला कळते आणि आम्हीपण सर्व विषयात रस घेतो.
आमच्या शाळेत विविध विषयांसोबत योग, व्यायाम, चित्रकला, कार्यानुभव असे विषय शिकवले जातात. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणांचा अवलोकन करीत असतात. त्याप्रमाणे त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलवून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आंतरशालेय तसेच इतर देशांमध्ये पण आमच्या शाळेतील मुले चमकली आहेत. आम्ही खूप गर्वाने सांगतो कि हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे. आमच्या शाळेचा निकाल नेहमी उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९८% यश प्राप्त केले आमची एक विद्यार्थिनी जिल्हा टॉपपेर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली . याचे श्रेया आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि मुख्याध्यापक यांना जाते.
माझी शाळा जरी तालुकास्तरावर असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात मुख्याध्यापक यांनी सांगितले कि, या वर्षांपासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक खुश आहे कि त्यांच्या त्यांच्या मुलांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.

असे वाटते शाळा सोडून जाऊ नये. पण नाही! आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनविण्यात मदत करत राहील.

Mazi Shala Nibandh PDF Download Free!

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!